हाई ल्या आखो कानबाईनी गानी!
१५ दिवसांपुर्वी भावाकडे कानबाई झाली.
नविन काही गाणी मिळालीत जुन्या बायकांकडुन. :)
१) घरधनीनी मंडप सवारा, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय
गावना मारुतीनी शिवार रोखी, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय
गावना मारुतीले शेंदुर नारय, कथाईन जाशी...
गावना पाटीलने दरजा (दरवाजा) रोखा, कथाईन...
गावना पाटीलले पान सुपारी, कथाईन जाशी...
घरधनीनी मंडप संवारा, कथाईन जाशी...
घरधनीना जयजयकार, तठेच राहसु वं माय!
२) हाऊ काय सरावन महीना वं माय
पान वार्यानं उडेल वं माय
आईच्या दरबारी पडेल वं माय
आईने शेल्याने झाकीले वं माय
आईचा सासरा दशरथ वं माय, सासरा दशरथ
आईनी सासु केगामती (कैकयी) वं माय
आईना राम भरतार वं माय, राम भरतार
३) सुर्या निंघना, कानडी (कानबाई) उभ्या, दारावरी
तापी गोमीना(गोमती नदी) मेळ देव चांग्यावरी
सुर्या निंघना...
डोकी तांबन्या घागरी भेट गंगेवरी
४) कानबाई सांगे रानबाईने
थारा कोठे लेशी वं माय
थारा लेसु वारा लेसु
... भाईना घर वं माय
... भाईनं सुर्यामुखी दार
याने बसनं ठाकं दारी वं माय
ठाकं दारी याने मंडप दिला भारी वं माय
५) सहा महिन्याची रात्र गेली, गेले होते कुठे गं
वाणियाच्या दुकानी मी बसलो होतो तिथे गं
नारळाच्या गोणी मी तो खरेदी केल्या दोन्ही गं
सहा महिन्याची रात्र...
वाणियाच्या दुकानी मी...
खारकाच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं
सहा महिन्याची रात्र गेली...
वाणीयाच्या दुकानी मी.....
लिंबोळ्याच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं

होळीना पह्यले आठ दिन पोरेसोरेस्नी लगबग सुरु व्हये....वर्गनी आणि लाकडं मांगानं करता. जर गल्लीमां कुणी लाकडं नै दिधी तं बस्स...त्याले असा तर्रास देये पोरे!! एक साल, एक डॉक्टरने वर्गणी मांगाना करता ज्या पोरे जाएल व्हते त्यास्ले हाकलुन दिन्थं. बस्स्...पोरे चिडी ग्यात. रातमां, त्यान्हा डॉक्टरनां बोर्ड काढुन त्या टुकार पोरेस्नी न्हाईना घरना बाहेर टांगी दिधा. आणि न्हाईना बोर्ड... हाई डॉक्टरना घरना भायेर. सकायी उठीसन ही बोम्ब व्हयनी व्हती. 