लोकेसहो!
आतेच धुळवड खेळी ना! आम्हन्या धुयामां बी होळी ना येगळाच रंग चढस.
मन्हा बाबा सांगे..त्यान्हा टाईमले धुळवडना मोठा दांगडो व्हये. आते आम्ही ६वी गल्ली ना लोके तुम्हले माहीती नैत. धुळामां हरेक गल्ली म्हन्जे विशेष शे. ६वी गल्ली म्हण्जे दादा लोकेस्नी गल्ली समजतस. ५वी गल्ली बाम्हन लोकेस्नी. तीन्हा बाजुले खोलगल्ली- गल्ली नंबर ४. बारीशमां आख्खा गावनं पाणी खोलगल्ली मां भरे. खोलगल्लीना जोडे आग्रा रोड... कपडास्ना आणि सराफ बाजार. आग्रा रोडना एक साईडले पाच कंदील.
पुर्वी माघ पौर्णिमा ले म्हन्जे होळीना पह्यले नी पौर्णिमालेच रस्तामां खड्डा खणीसन एरंडनं झाड गाडी देत. मग बठ्ठा लोकेस्नी समझी लेवानं की होळी महिनाभर शे आते.


हां तर धुळवडनी बात करी राह्यनु. तव्हय गल्लीना कोपरा कोपरामां मोठा मोठा कलरनं पाणीना ड्रम बैलगाडीमां भरी लईयेत. आणि तठा ठी देत. अन मग रोडवरुन जानारा एक भी माणुस सुटे नै. त्या काय आसं इचकुपिचकु पिचकारी लिसन नै खेयेत. इतली मोठी डोलची मां पाणी लिसन माणसास्ले पाठवर सपका मारे तं तुमन्हा शर्ट काय करतस्...बनियन बी फाटी जाए लोकेस्ना!!! कोनी मजाकना व्हई तं त्याले उचलीसन ड्रममां बुचकाळी देत.
आते तं काय लोकेस्ले पेवाले पानी नै शे नि काय लोके होळी खेळतीन! तर आशी व्हये आम्हन्या गावनी होळी.
आखो लिखानं शे... येळ मिळी तसं लिखसु. :)