लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
बाजरी : एक किलो
तांदुळः अर्धी वाटी
तुरीची दाळः अर्धी वाटी
गुळ, साजुक तुप, मीठ नेहमीप्रमाणे
तिखट करायची असल्यासः फोडणीसाठी १-२ मध्यम आकाराचे कांदे चिरुन, ओले वाटाणे, शेंगदाणे, लसुण, हिंग, चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ आणि थोडासा गरम मसाला

क्रमवार पाककृती:
ढासले : म्हणजे बाजरीची खिचडी म्हणा हवे तर.
७-८ माणसांसाठी एक किलो बाजरी धुवुन निथरुन ठेवावी...थोडीशी सुकल्यावर ओलसर असतांनाच कांडावी. पाखडावी म्हणजे टरफले निघुन जातात. नंतर चाळणीने चाळुन घ्यावी ..म्हणजे पीठ, कोंडा काढता येतो. आता ही बाजरी त्यात अर्धी अर्धी वाटी तांदुळ ( खिचडीचा) आणि दाळ (तुरीची किंवा हरभ-याची) घालुन मीठ, किंचीतशी हळद , हिंग घालुन कुकरमधुन २-३ शिट्ट्या करुन काढावी. खिचडीला पाणी जास्त लागते कारण बाजरी आणी तुरीची दाळ! गरमागरम खिचडीवर गुळ, तुप घालुन खातात.
थंडीच्या दिवसात उत्तम.
हीच खिचडी आम्ही तिखट करतो. कांदा, लसुन, हळद, हिंग,लाल तिखट, शेंगदाणे, (ओले वाटाणे ही घालतात)घालुन फोडणी करुन घ्यावी. त्यात पाणी ओतुन वर सांगितल्या प्रमाणे पाखडलेली बाजरी, तांदुळ, तुरीची दाळ धुउन टाकावे. ही खिचडी शिजत असतांनाच असला खमंग वास पसरतो कि यंव!!!
खिचडी शिजली की वरुन चिरलेली कोथिंबिर पसरावी.

वाढणी/प्रमाण:
७-८ जणांसाठी
अधिक टिपा:
खान्देशी माणुस आणि खिचडीच वेगळच नातं आहे. खिचडी आणी वर तेलाचीच(शेंगदाणा/गोडेतेल) धार...कसली सर नाही त्याला. आणि हो, तेल कच्चेच असावे...
मग त्याबरोबर कैरीचेच लोणचे, पापड, हा सरंजाम असला किंवा नसला तरी चालते.

माहितीचा स्रोत:
आई
धुळामा राहीसन धुळाना इतीहास माहीत नहीअामले आभारी
ReplyDeleteखुप स्तुत्य प्रपंच चालवताय तुम्हि. मी मुळ खानदेशी नसलो तरी माझे बरेच मित्र खानदेशी आहेत त्यामुळे ह्या भाषेविषयी, लोकांबद्दल, त्यांची संस्कृती, खाणे-पिणे ह्या बद्दल जाम ओढ आणि आदर आहे.
ReplyDeleteतुम्हि खानदेशी "काळ्या आमटीची" पण पाककृती टाका ना, ती आमटी जी पुरणपोळी बरोबर केली जाते, त्या बरोबर कुरडई, पापड, भजी खाल्ले जातात. व्वा काय बात आहे त्या आमटीत :)